जवळपास एक महिन्यापासून घरात एकटीच होती गाय, महिन्यानंतर दरवाजा उघडताच मोठमोठ्याने रडायला लागला मालक..’

अनेक लोक नवीन घर घेण्याचे स्वप्न पाहत असतात. स्वतःच्या पैशांनी घेतलेले नवीन घर प्रत्येक कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण करत असते. हे घर जेव्हा नवीन असते तेव्हा ते खूप आकर्षक असते आणि त्यात स्वच्छता देखील चांगली असते.

यामुळे त्या घरामध्ये राहण्याची मजा देखील काही वेगळीच असते. पण असा विचार करा की तुम्ही तुमच्या नवीन घरात चालले आहात, परंतु घराचा दरवाजा उघडताच तुम्हाला संपूर्ण घर शेणाने भरलेले अडळले तर, इतकेच नाही तर एक गाय देखील तुमच्या नवीन घरात असेल.

आणि तुम्हाला त्याची कल्पना पण नसेल की ही गाय तुमच्या घरात कुठून आली असेल. साहजिकच प्रत्येकजण आश्चर्यचकित होईल आणि तुम्हाला तुमच्या त्या घराची स्थिती बघून अक्षरशा रडू कोसळेल. पण असेच काहीसे अमेरिकेच्या मॉन्टाना या शहरात बघायला मिळाले होते.

वास्तविक एक व्यक्ती वॉशिंग्टनमध्ये राहत होती आणि लवकरच तो त्याच्या कुटुंबियांसह मॉन्टाना शहरामधील त्याच्या त्या नवीन घरात शिफ्ट होणार होता. त्याचे ते नवीन घर सांभाळण्याची जबाबदारी त्याने एका बाईला दिली होती.

यानंतर, तो त्याच्या सामानासह नवीन घरात राहण्यासाठी आला त्यावेळी त्याच्या घरातील स्थिती बघून तो जोरजोरात ओरडू लागला. घराच्या आत मध्ये एक गाय होती व त्या गायीने संपूर्ण घरभर शेण केले होते की अगदी जमिनीवरची फरशी देखील दिसत नव्हती.

या व्यक्तीच्या नवीन घराची स्थिती उकिरड्या पेक्षा वाईट झाली होती. हे दृष्य पाहून त्या माणसाला मोठा धक्का बसला. नेमका हा विषय काय आहे हे त्याला समजले नाही. असं म्हटलं जात आहे की गाय जवळपास महिनाभरापासून या घरात राहत होती.

इतकेच नाही तर घराभोवती बरीच हिरवळ देखील आहे, त्यामुळे गायीने या काळात भरपूर गवत देखील खाल्ले असावे, याचा परिणाम घरामध्ये सर्वत्र शेण दिसत होते. तथापि, ही गाय अखेर घरात कशी आली हे अद्याप समजू शकले नाही.

या प्रकरणात गायीच्या मालकाकडे ही काही माहिती नाही. आता कल्पना करा की त्या गरीब माणसाने आपल्या नवीन घराच्या साफसफाईसाठी किती वेळ खर्च केला असेल. स्वच्छता सोडून द्या, विचार करा की त्याने घरातल्या शेणाच्या वासापासून आपली सुटका कशी केली असेल.

ही संपूर्ण घटना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. विशेषत: त्या शेणाचे फोटो खूप प्रसिद्ध झाले होते. एकीकडे काही लोक ते पाहून हसत होते तर काहींना त्या माणसाबद्दल दया येत होती. काहीही असो.

पण आता तुम्हालाही हे माहित झालेच असावे की जेव्हा गाय घरात एकटीच असेल तेव्हा गाय आपले काय गुण उधळेल काय सांगता येत नाही. तसे, जर भारतात ही घटना घडली असती तर या गायीच्या शेणापासून अनेक उद्योग केले गेले असते.

Leave a Comment