जग सोडून गेल्यानंतर या 5 अभिनेत्रींचे कुटुंब झाले करोडपती, या अभिनेत्रींच्या कुटुंबाला तर मिळाले चक्क 247 कोटी रुपये…

बॉलिवूडमधिल बर्‍याच आभिनेत्रींचा आकस्मिक मृत्यू आजही आपल्याला हैराण करतो. आजही आपल्याला काही अभिनेत्रींच्या मृत्यूचे कारण माहीत नाही. या अभिनेत्रींनी जग सोडले पण त्यांनी त्यांची कोट्यवधींची संपत्तीही मागे सोडली. त्यांनी आयुष्यात इतके पैसे कमवले की त्या निघून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना काम करण्याची गरज नाही.

या आभिनेत्रींनी कठोर परिश्रम करून इतके पैसे कमावले आहे की त्यांच्या 7 पिढ्या सहज बसून खाऊ शकतात. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बॉलिवूडमधील अशा काही नामांकित अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी कोट्यवधींची संपत्ती मागे ठेवली आहे.

जीया खान

‘गजनी’ आणि ‘निशब्द’ सारखे चित्रपट करून जिया बॉलिवूडची एक नामांकित अभिनेत्री बनली. मुंबईत आल्यानंतर जिया आदित्य पंचोलीचा मुलगा सूरज पंचोलीला भेटली. दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली आणि ते प्रेमात पडले. पण या नात्याचा परिणाम खूप वेदनादायक होता. जियाचा मृ तदेह 3 जून 2013 रोजी जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. लहान वयातच जीया तिच्या कुटुंबीयांसाठी 15 कोटींची संपत्ती मागे सोडुन गेली.

दिव्या भारती

दिव्या भारती ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अशी अभिनेत्री होती जिने अगदी लहान वयातच आपली ओळख निर्माण केली. तिने अनेक हिट चित्रपटांत काम केले. दिव्या खूप हुशार तसेच सुंदरही होती. तिची चित्रपट कारकीर्द खूपच लहान होती पण या दरम्यान तिने अनेक हिट चित्रपट दिले. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे दिव्या भारतीचे निधन झाले. नि धनानंतर दिव्या भारती तिच्या कुटुंबीयांसाठी 70 कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली.

श्रीदेवी

श्रीदेवीच्या अकाली मृ त्यूने सर्वांना हादरवून टाकले. म द्यधुंद अवस्थेत बाथरूमच्या बाथटबमध्ये बुडल्याने श्रीदेवीचा मृत्यू झाला. ती आपल्या कुटूंबासमवेत एका कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती. श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हटले जाते. तिच्या फिल्मी करिअरमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रीदेवी 247 कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली आहे.

सौंदर्या

सौंदर्या ही दक्षिण फिल्म इंडस्ट्रीतली एक नामांकित अभिनेत्री होती. तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘सूर्यवंशम’ चित्रपटामुळे लोकांना आजही सौंदर्या आठवते . अभिनेत्री होण्याबरोबरच सौंदर्या एक राजकारणीही होती. निवडणूक प्रचारादरम्यान सौंदर्याचा विमान अपघात झाला आणि तिचा मृत्यू झाला. ती 50 कोटींची संपत्ती मागे ठेवून गेली आहे .

रीमा लागू

रीमा बॉलिवूड आणि छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री होती. आईच्या भूमिकेत रीमाने बर्‍याच उत्कृष्ट व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. लोकांना अजूनही रीमाचे सर्वोत्कृष्ट पात्र आठवतात. रीमाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिने 30 कोटींची संपत्ती मागे ठेवली आहे.

Leave a Comment