चित्रपटात वृध्द दिसणार्‍या या अभिनेत्र्या खर्‍या आयुष्यात आहेत खूपच ग्लॅमरस आणि हॉट, एक तर बनली होती रणवीर ची आई…’

एक अष्टपैलू कलाकार त्यालाच म्हंटले जाते जो सर्व प्रकारच्या भुमिका साकारण्यास तयार असतो. बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या प्रतिमेमुळे काही उत्कृष्ट भूमिका सोडल्या आहेत.

परंतु अशा काही अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या प्रतिमेची पर्वा न करता जोखीम घेण्यास तयार असतात आणि त्या सर्व प्रकारच्या भूमिका करण्यास नेहमी तयार असतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये आईचे पात्र नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे.

काळाबरोबर आईची प्रतिमा आणि तिचे स्वरूप दोन्ही बदलले आहेत. पूर्वीच्या काळात वृध्द अभिनेत्रीच आईची भूमिका साकारत असे, पण आजच्या युगात नायक/नायिकेपेक्षा लहान अभिनेत्री देखील आईची भूमिका निभावते. चित्रपटात आईची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्री ग्लॅमरस वाटत नाहीत.

परंतु जेव्हा आपण त्यांना वास्तविक जीवनात पहाल तेव्हा तूम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. मोठ्या पडद्यावर आईची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्री खर्‍या आयुष्यात खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस आहेत. आजच्या या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही ऑनस्क्रीन आईची ओळख करुन देणार आहोत.

अर्चना जोइस

वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ चित्रपटात अर्चना जोइसने यशच्या आईची भूमिका केली होती. पण अर्चना खर्‍याआयुष्यात खूपच तरुण आहे आणि ती खूप सुंदर दिसते.

मेहेर विज

मेहर विज सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटामध्ये दिसली होती. यात तिने मुन्नीच्या आईची भूमिका साकारली होती. चित्रपटात मेहेर विज साधी-सरळ दिसत असली तरी खर्‍या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.

नादिया

नादियाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या मिर्ची या चित्रपटात ती प्रभासची आई बनली होती. चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणारी नादिया खर्‍या आयुष्यात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

राम्या कृष्णन

राम्या कृष्णन ही तिच्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री होती. ‘बाहुबली’ चित्रपटात तिने माता शिवगामी देवीची भूमिका साकारली होती. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणारी राम्या खर्‍या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

अमृता सुभाष

अमृता सुभाषने रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गली बॉय’ या चित्रपटात रणवीरच्या आईची भूमिका साकारली होती. राम्या या चित्रपटात रणवीरची आई बनली होती, परंतु चित्रात आपल्याला दिसू शकते, ती वास्तविक जीवनात खूपच तरुण आहे. अमृता दिसायलाही खूप निरगास आणि सुंदर आहे.

मित्रांनो आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Comment