बॉलिवूड एक अशी माया नगरी आहे जिथे कधी कोण कोणाबरोबर सेट होईल आणि कोण कधी आपल्या पत्नी किंवा पतीला घटस्फोट देईल, याबद्दल काहीही बोलले जाऊ शकत नाही. कधी जे एकमेकांच्या प्रेमात वेडे असतात त्यांच्या घटस्फोटाची बातमी समोर येते.
याबद्दल स्वत: त्या तार्यांना देखील माहिती नसते. अफेअर, डेट, लग्न आणि नंतर घटस्फोट हे एका नात्यात बघायला मिळते. त्यांच्या लग्नाची बातमी जितकी लवकर व्हायरल होते त्याचप्रमाणे एक-दोन वर्षांत किंवा 6 माहिन्यातच त्यांच्या घटस्फोटाची बातमी येते.
ही एक विचित्र गोष्ट आहे पण बॉलिवूडमध्ये हे सामान्य आहे. बरेच जोडपे एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत, मतभेदांमुळे ते घटस्फोट घेतात. परंतु घटस्फोटानंतर या अभिनेत्रींनी दुसरे लग्न केले नाही, या यादीमध्ये अशा अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पतीवर खरे प्रेम केले असेल.
घटस्फोटानंतर या अभिनेत्रींनी दुसरे लग्न केले नाही
ज्या व्यक्ती सोबत मन जुळते त्याच्यासोबत लग्न केले जाते, परंतु काही काळ एकत्र राहिल्या नंतर त्या व्यक्तीसोबत एकत्र राहू शकत नाही. आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगनार आहोत ज्यांनी घटस्फोटानंतर दुसरे लग्न केले नाही.
1. कल्कि कोचलिन
चित्रपटसृष्टीत अत्यंत बोल्ड शैलीमुळे कल्की नेहमी चर्चेत असते. २०११ साली तिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपशी लग्न केले आणि तीन वर्षांनंतर ते वेगळे झाले. यानंतर, कल्कीने आजपर्यंत दुसरे लग्न केले नाही, तर अनुराग कश्यपचे त्याच्या पेक्षा वयाने लहान असलेल्या एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत आणि म्हणुन तो चर्चेत आहे.
2. मनीषा कोईराला
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री मनीषा कोईरालाने सलमान, शाहरुख आणि आमिर या तिघांसोबत काम केले आहे. तिने कर्करोगासारख्या दीर्घ आणि गंभीर आजारावर मात केली आहे, आणि ती आज बॉलिवूड चित्रपटांमध्येही पाहायला मिळते.
पण ती आज पूर्णपणे एकटी आहे कारण २०१२ मध्ये घटस्फोटानंतर ती मुंबईत आली आणि इथेच स्थायिक झाली. यानंतर, तिने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले आणि लग्नाचा विचारही मनात येऊ दिला नाही.
3. संगीता बिजलानी
एकेकाळी सलमान खानला डेट करणारी अभिनेत्री संगीता बिजलानीने त्याच्यासोबत लग्न करायचे ठरवले होते. बॉलिवूड कॉरिडोरमध्येही याबद्दल चर्चा होवू लागली होती, पण असं काही तरी घडलं की त्यांचे लग्न मोडले.
आणि संगीताने क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीशी लग्न केले. तथापि, त्यांना कोणतीही मुले झाली नाहीत आणि ते वेगळे झाले. २०१० साली संगीताचे लग्न मोडले आणि त्यानंतर तिने दुसरे लग्न केले नाही पण बर्याच वेळा ती सलमान सोबत दिसली आहे.
4. पूजा भट्ट
बॉलिवूड चित्रपट निर्माता आणि अभिनेत्री पूजा भट्टने वयाच्या 20 व्या वर्षी तिच्या एका मित्राशी लग्न केले. पण 2003 साली त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर पूजाने दुसरे लग्न केले नाही. जेव्हा तिला मीडियामध्ये या प्रश्नाचे उत्तर विचारले गेले तेव्हा ती हसली आणि उत्तर दिले की मला एक चांगला वर सापडलाच नाही.
5. अमृता सिंग
80 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री अमृता सिंगने लहान नवाब सैफ अली खानशी लग्न केले होते. सैफशी लग्ना केल्यानंतर त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान अशी दोन मुले झाली. सैफ अमृतापेक्षा 10 वर्षांनी लहान होta.
आणि त्यांचे लग्न वर्ष 2004 मध्ये मोडले. घटस्फोटानंतर अमृताने दुसरे लग्न केले नाही पण सैफने करीनाशी लग्न केले. ज्याने त्यांना मुलगाही झाला आहे.