खूप दिवसापासून या मुलाचे दु-खायचे पोट म्हणून डॉक्टरांनी केले ऑ-परेशन, त्यांना पोटात जे दिसले ते पाहून रडायला लागले डॉक्टर…’

एका 5 वर्षाच्या मुलाला मागील एका वर्षापासून पोटात वेदना होत होत्या. त्यामुळे जेव्हा तो डॉक्टरांकडे उपचारासाठी गेला तेव्हा तो बरा झाला पण काही दिवसानंतर त्याचे शरीर दिवसेंदिवस अशक्त होऊ लागले.

आणि जेव्हा या मुलावर श-स्त्रक्रिया केली गेली तेव्हा असता डॉक्टरांना सुद्धा मोठा धक्का बसला. सा-पांच्या आकारासारखे दिसणारे, धाग्याने बनलेले १ फूट लांबीचे गुच्छ त्याच्या पोटातून बाहेर निघाले. ही घटना राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील एका पाच वर्षांच्या मुलांसोबत घडली आहे.

बुंदी जिल्ह्यातील हिंदोली येथे राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलाला गेल्या एक वर्षापासून पोटात दुखणे आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. त्याला त्याच्या आई वडिलांनी अनेक वेळा डॉक्टरांना देखील दाखवले. तेव्हा तो केलेल्या उपचारानी बरा सुद्धा व्हायचा.

परंतु तो काही दिवसांनी खूप अशक्त पडला आणि त्याने काही खाण्यापिण्याचे देखील सोडून दिले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी जेव्हा बुंदी येथील डॉक्टर व्ही.एन. याना दाखवले तेव्हा त्यांना असे आढळले की त्याच्या पोटात एक मोठी गाठ आहे.

त्यानंतर त्यांनी त्या मुलाला कोटाचे वरिष्ठ बालरोग सर्जन डॉ. समीर मेहता यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा डॉ. समीर यांनी मुलाचे ऑपरेशन मेहता नर्सिंग होममध्ये केले आणि तेव्हा त्यांना अश्यर्यचा धक्काच बसला.

त्यांना त्या बाळाच्या पोटामधून सापासारख्या दिसणाऱ्या, दोरीसारखा १ फूट लांबीचा गुच्छ बाहेर निघाला. डॉ. समीर म्हणाले की हा एक अत्यंत दुर्मिळ आजार आहे आणि वैद्यकीय भाषेत याला रॅपन्जेल सिंड्रोम म्हणतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, रुग्ण त्याचे केस तोडून खातात परंतु या मुलाने कपड्याचे धागे खाल्ले जे अतिशय असामान्य होते.

डॉ. समीर यांनी देखील वीस वर्षांत प्रथमच अशी घटना पाहिली होती. नेस्थेसिया प्रदान करणारे तज्ञ डॉक्टर जेपी गुप्ता यांचे या ऑपरेशनमध्ये विशेष योगदान होते. आता या मुलास अर्भक अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे आणि डॉक्टरांचे असे म्हणणे आहे की तो तीन ते चार दिवसांनी खाणे पिणे सुरू करेल. या रोगाला ट्रायकोबिझर असेही म्हणतात.

Leave a Comment