खूपच सुंदर आणि हॉट दिसते इम्रान हाश्मीची बहीण, कॅटरिना-दीपिकाला मागे टाकून करतेय बॉलीवूड वर राज ‘पहा फोटो’…

भट्ट कुटुंबाचे नाव बॉलिवूडमध्ये नेहमीच चर्चेत आहे. भट्ट कुटुंबात अनेक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. भट्ट घराण्याच्या निर्मात्यांची इमरान हाशमी ही पहिली पसंती आहे. 2003 मध्ये विक्रम भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली इमरानने फुटपाथ मधुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

इमरान हाशमीचे बॉलिवूड इंडस्ट्री मधील पदार्पण अप्रतिम होते आणि तो त्याच्या एका खास प्रतिमेसाठी प्रसिद्ध झाला. आपल्या अभिनयाच्या जोरावर इमरानने बरेच हिट चित्रपट दिले आणि आज त्याची गणना बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्यांमध्ये केली जाते. दिग्दर्शकांनाही त्याच्याबरोबर काम करायला आवडते.

पण, तुम्हाला माहिती आहे काय की इमरान हाशमीची बहीणही बॉलिवूडमध्ये काम करते. होय, धक्का बसला ना? पण, हे अगदी खरे आहे की इमरान हाशमीची बहीण बर्याच वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहे आणि ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

ती इतकी सुंदर आहे की तुम्हालाही ती आवडत असेल आणि तुम्ही तिचे चित्रपटही पाहिलेले असतील. तर आज आम्ही तुम्हाला इमरान हाशमीच्या बहिणीची ओळख करुन देतो. वास्तविक, इमरान हाशमीच्या बहिणीचे नाव आलिया भट्ट आहे. आलिया भट्ट इमरान हाशमीची चुलत बहीण आहे.

वास्तविक, इमरान हाशमीच्या आजीच्या बहिणीचे नाव शिरीन मोहम्मद अली होते. शिरीन मोहम्मद अली महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांची आई होती. या नात्याने इमरान आणि आलिया भाऊ-बहिण आहे. महत्वाचे म्हणजे एकदा एक चित्रपट निर्माता आलिया भट्ट सोबत काम करण्याच्या प्रस्ताव घेवुन इमरान हाशमीकडे गेला होता.

इमरानने त्या चित्रपट निर्मात्यांना नकार दिला. इमरान हाशमी आणि आलिया भट्ट भाऊ-बहिण आहेत. आलिया भट्ट बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी आहे.

आलिया भट्ट आणि इमरान हाशमी कधी चित्रपटात एकत्र दिसतील का? हा असा प्रश्न आहे की त्याचे उत्तर नेहमीच नाही असेल. एका मुलाखतीदरम्यान स्वत: इमरान हाशमीने असे म्हटले आहे की त्याचे आणि आलियाचे कोणत्याही चित्रपटात एकत्र काम करणे शक्य नाही.

कारण भाऊ आणि बहीण यांच्यामधील रोमँटिक सीन पाहायला प्रत्येकाला विचित्र वाटेल. त्यांच्या नात्याबाबत इमराने सांगितले की, मी आलियाचा ‘स्टूडंट ऑफ दी इयर’ हा चित्रपट न पाहिल्यामुळे बरेच दिवस ती माझ्यावर रागावली होती. मी जो पर्यंत आलियाचा चित्रपट बघितला नाही तोपर्यंत ती माझ्याशी बोलली नाही.

म्हणजेच हे निश्चित आहे की हे दोघेही कधीही चित्रपटात एकत्र दिसणार नाहीत.

Leave a Comment