कायमच जग सोडून गेली ‘कूम-कूम भाग्य’ मालिकेतील हि तुमची आवडती अभिनेत्री, फोटो पाहाल तर तुम्हालाही बसेल मोठा धक्का…’

जर 2020 या वर्षाला सर्वात वाईट आणि बेकार वर्ष म्हटले गेले तर ते चुकीचे ठरणार नाही. यावर्षी बॉलीवूडचे अनेक सुपरस्टार आपल्याला कायमचे सोडून गेले. चित्रपटसृष्टीपासून ते टीव्ही इंडस्ट्रीपर्यंतचे अनेक नामांकित चेहरे आपल्यापासून कायमचे वेगळे झाले.

अशा परिस्थितीत टीव्ही इंडस्ट्रीतुन आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. थोड्या दिवसांपूर्वी म्हणजेच 19 नोंव्हेबर रोजी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री झरीना रोशन खान यांचे निधन झाले.

जरीना रोशन खानने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कुमकुम भाग्य’ यासारख्या मालिकांमध्ये काम केले होते. या मालिकांमधून त्यांना जबरदस्त ओळख मिळाली आणि त्यामुळेच त्या घरोघरी लोकप्रिय झाल्या होत्या.

अशा परिस्थितीत जरीना याचे अचानक निघून जाणे हे कोणत्या धक्क्यापेक्षा कमी नाही. आपणास सांगू इच्छितो की, हार्ट अटॅकमुळे या अभिनेत्रीने जगाला शेवटचा निरोप दिला. त्या फक्त 54 वर्षांच्या होत्या. जरीना यांच्या मृत्यूमुळे तिचे अनेक चाहते सुद्धा दु: खी झाले आहेत.

तसेच सहकारी कलाकारांमध्ये सुद्धा शोककळा पसरली आहे. जरीना या फक्त छोट्या पडद्यापुरत्या मर्यादीत राहिल्या नाहीत तर अनेक चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला होता. तथापि, ही वेगळी बाब आहे की मालिकांमुळे त्यांना खरी ओळख मिळाली.

झरीना यांनी टीव्ही सीरियल ‘कुमकुम भाग्य’ मध्ये ‘इंदू सूरी’ याची भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांमध्ये बरीच लोकप्रिय झाली होती. पण त्यांच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाच चकित केले आहे. अभिनेता शब्बीर अहलुवालिया आणि श्रीती झा यांनी सुद्धा जरीना याना श्रद्धांजली वाहताना त्यांच्या फोटोसह एक पोस्ट शेअर केली आहे.

जरीना याच्याबरोबर एक फोटो शेअर करताना शब्बीरने लिहिले आहे की, “ये चांद सा रोशन चेहरा”. शब्बीरच्या या पोस्टवर श्रद्धा आर्य, मृणाल ठाकूर, अंकित मोहन आणि इतर स्टार्सनीही झरीना याच्याबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.

त्याचवेळी अभिनेत्री सिती झा हिने सुद्धा तिच्या आवडत्या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. श्रीतीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये जरीना या मस्ती करताना आणि नाचताना दिसत आहेत. तसेच, श्रीती झाने जरीना याच्यासोबतचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

Leave a Comment