आज काजोल आणि अजय देवगनचा तानाजी: द अनसंग वॉरियर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. या दरम्यान, काजोलने एक खुलासा केला आहे तो ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. काजोलने हा खुलासा कोणत्याही चित्रपट किंवा नायक-नायिकेबद्दल नाही,
तर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केला आहे. काजोलचे नाव बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींमध्ये समाविष्ट आहे ज्या त्यांच्या बोलक्या स्वभावासाठी परिचित आहेत. त्या त्यांच्या मनात जे आहे तेच बोलता. काजोलचीही तिच गोष्ट तिच्या चाहत्यांना आवडते.
पण अलीकडेच काजोलने केलेला एक खुलासा ऐकून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहे. काजोलने खुलासा केला आहे की तिने तिच्या आणि अजय देवगणच्या लग्नाबद्दल एक मोठे खोटे बोलली आहे. तसेच, तिने अशी अनेक रहस्ये उघडली आहेत जी त्यांच्या गुप्त विवाहाशी संबंधित होती.
वास्तविक, जेव्हा काजोल आणि अजय देवगनचे लग्न झाले होते, त्यावेळी सोशल मीडियाचा काळ नव्हता. त्यावेळी लोकांपर्यंत कोणतीही बातमी इतक्या सहज पोहचत नव्हती. त्यांना कोणतीही माहिती बातम्यांमधूनच मिळत असे. अशा परिस्थितीत बहुतेक लोकांना त्यांच्या लग्नाविषयी माहिती नव्हती.
काजोल अजयला तिच्या प्रियकराबद्दल वाईट गोष्टी सांगायची
तानाजी या चित्रपटाद्वारे सुमारे 11 वर्षानंतर काजोल आणि अजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसले. अशा परिस्थितीत काजोलने तिच्या आयुष्याशी संबंधित एक रहस्य उघडले आहे. या प्रकरणाशी संबंधित दोघांनीही एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना काजोलने लिहिले की, “आमची भेट 25 वर्षांपूर्वी ‘हलचल’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
मी शूट करण्यासाठी तयार होते, तेव्हा मी विचारले माझा नायक कोठे आहे, त्यावेळी कुणीतरी मला इशारा देऊन सांगितले की तो तिथे बसलेला आहे. त्याला भेटण्याच्या 10 मिनिटांपूर्वी मी त्याच्या बद्दल वाईट गोष्टी बोलले होते . आम्ही सेटवरच बोलायला सुरवात केली आणि मग आम्ही मित्र बनलो ”. जेव्हा दोघे एकमेकांना भेटले होते, तेव्हा ते दोघेही वेगवेगळ्या लोकांना डेट करत होते. काजोल अजयला तिच्या प्रियकराबद्दल वाईट गोष्टी सांगत असे.
कधीही एकमेकांना प्रपोज केले नाही
काजोलने सांगितले की, “आम्ही दोघे त्या वेळी कोणालातरी डेट करत होतो, त्या नंतर लवकरच आमचे ब्रेकअप झाले. आम्ही दोघांनी कधीही एकमेकांना प्रस्ताव दिला नाही कारण आम्हाला माहित होते की आम्ही एकत्र होतो. आम्हाला काहीही माहित होण्यापूर्वी आम्ही हातात हात घालून बरेच काही करण्यास सुरवात केली होती.
आम्ही डिनर आणि ड्राईव्ह ला जायचो. तो जुहूमध्ये राहत होता आणि मी दक्षिण मुंबई आमचे निम्मे संबंध तर कारमध्ये झाले होते. माझ्या मित्रांनी मला अजय बद्दल चेतावणी दिली होती कारण त्याच्याबद्दल लोकांचे एक मत बनले होते. पण तो माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा होता आणि मला फक्त हेच माहित होते.
लग्नाचे ठिकाण चुकीचे संगितले होते.
त्याचबरोबर काजोलने सांगितले की इतर लोकांप्रमाणेच त्यांनाही त्यांच्या प्रेमकथेत अनेक अडचणी आल्या होत्या. आपले लग्न गुप्त ठेवण्यासाठी काजोल माध्यमांशी खोट बोलली. लग्न गुप्त ठेवण्यासाठी काजोलने माध्यमांना लग्नाचे ठिकाण चुकीचे सांगितले होते. काजोलने लिहिले की, “आम्ही 4 वर्ष नात्यात होतो.
आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजयचे आई-वडील तयार होते, पण माझ्या वडिलांना हे नाते मान्य नव्हते. ते 4 दिवस माझ्यासोबत बोलत नव्हते. मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे अशी त्यांची इच्छा होती. पण मी निर्णय घेतलेला होता आणि नंतर त्यांनीही आम्हाला साथ दिली.
आम्ही घरीच लग्न केले होते पण मीडियाला चुकीच्या जागेचा पत्ता दिला होता. कारण हा दिवस फक्त आमचाच असावा अशी आमची इच्छा होती. आमचे लग्न पंजाबी आणि मराठी या दोन्ही पध्दतीने झाले. मला आठवते की अजयला कोणत्याही परिस्थितीत लग्न लवकरात लवकर संपवायचे होते. त्याने तर पंडितला लाच देण्याचाही प्रयत्न केला होता. ”