करीनाचा मोठा खुलासा, बोलली चित्रपटात काम देण्यासाठी अमीर ने मला वयक्तिक एका खोलीत नेऊन करायला लावले होते हे काम..

करीना कपूर बॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. चित्रपट पार्श्वभूमी असणार्या कपूर कुटुंबातून आल्यामुळे करीनाला बॉलिवूडमध्ये भूमिका मिळवण्यासाठी कधीही फार कष्ट करावे लागले नव्हते. उदाहरणार्थ, कामाच्या शोधात तिला एका प्रोडक्शन हाऊसमधून दुसर्‍या चित्रपट दिग्दर्शकाकडे वारंवार ऑडिशन द्यायला जाण्याची गरज नव्हती.

करिनाने स्वत: कबूल केले आहे की तिने तिच्या आयुष्यात कधीच कोणत्याही चित्रपटासाठी ऑडिशन दिले नाही. सध्या तर करीना बॉलिवूडचे एक मोठे नाव आहे. अशा परिस्थितीत तिच्याकडून ऑडिशन घेण्याचा विचारही कोणी करणार नाही.

पण बॉलिवूडच्या मिस्टर परफेक्ट आमिर खानला ही गोष्ट आवडत नाही. खरं तर, अलीकडेच करीनाने स्वतः हा खुलासा केला होता की आमिर खानने तिला ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात असेच घेतले नव्हते. तर आमिरने आधी करिनाला सांगितले की या भूमिकेसाठी तुला ऑडिशन द्यावी लागेल.

हे ऐकून करिना आश्चर्यचकित झाली. तिने यापूर्वी कधीही चित्रपटासाठी ऑडिशन दिले नव्हते. त्यानंतर जेव्हा करीनाने तिचा नवरा सैफ अली खानला याबद्दल सांगितले तेव्हा त्याने करीनाला समजावून सांगितले. सैफने सांगितले की ऑडिशन्स देणे काही चूकीचे नाही.

करीना म्हणाली की आमिर खानला सर्व काही परिपूर्ण मार्गाने करणे आवडते. म्हणून कोणताही कलाकार चित्रपटाच्या भूमिकेसाठी परिपूर्ण आहे की नाही याची जोपर्यंत आमिरला शंभर टक्के खात्री होत नाही तोपर्यंत तो त्या कलाकाराला त्याच्या चित्रपटात घेत नाही.

या कारणामुळेच करीनानेही आमिरवर विश्वास ठेवला. नंतर आमिर ने मला एका खोलीत नेऊन बसवले होते. आणि माझ्याकडे स्क्रिप्ट दिली आणी मला ती करायला लावली, नंतर मी आनंदाने ऑडिशन दिली.

करिना सांगते की ती ऑडिशन देत असताना आमिरला मध्यभागीच कळले होते की मी त्याचे पात्र चांगलेच पकडले आहे. अशा परिस्थितीत आमिर ऑडिशनमध्ये ओरडला की मला माझं पात्र मिळाले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की ‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडचा प्रसिद्ध ऑस्कर विजेता चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ चा अधिकृत रिमेक आहे.

या चित्रपटात आमिर खानबरोबर करीना कपूरचे नाव आता फाइनल झाले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूकदेखील लीक झाला होता, जो प्रेक्षकांना खूप आवडला. या सिनेमात काम करण्यासाठी करिनाने इतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या होत्या.

वास्तविक, तैमूरचा जन्म झाल्यापासून करिना तिचे चित्रपट आणि भूमिका निवडण्यात खूप सावध झाली आहे. ती आता फक्त चांगली स्क्रिप्ट आणि दमदार भुमिका निवडते. या चित्रपटात करीना एक सामान्य सरदारनी म्हणून काम करणार आहे. यापूर्वीही जब वी मेट आणि उडता पंजाब यांसारख्या सिनेमांमध्ये करीनाने सरदारणीच्या मुलीची भूमिका केलेली आहे.

यापुर्वी या चित्रपटात आलिया भट्टला घेणार होते, पण आलियाने या चित्रपटाऐवजी संजय लीया भन्साळीच्या ‘इंशाल्लाह’ हा चित्रपट साइन केला. त्यावेळी या चित्रपटात सलमान खान मुख्य अभिनेता म्हणुन काम करनार होता.

Leave a Reply

Your email address will not be published.