कंगना रानौत ने केला महेश भट्ट बद्दल धक्कादायक खुलासा, बोलली चित्रपट रिजेक्ट केला तर ठा र मा रण्यासाठी आले होते…

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने आ त्मह त्याचे पाऊल उचलल्या नंतर कंगना रनौतने चित्रपट सृष्टीतील अनेक खुलासे केले. यावेळी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांना कंगना रनौतने लक्ष्य केले आहे. कंगना रनौत म्हणाली आहे की,भट्ट प्रॉडक्शनने मला गँगस्टर या चित्रपटात काम करण्याची संधी दिली होती.

याबद्दल मी त्यांची नक्कीच आभारी आहे. तरीही याचा अर्थ असा नाही की त्यांना मला वेडी म्हणायचा किंवा मला चप्पल ने मारण्याचा हक्क मिळाला. महेश भट्ट यांनी माझ्यावर चप्पल फेकली.

त्या दिवशी काय झाले?

ती घटना आठवताना कंगना राणौत म्हणाल्या आहेत की महेश भट्टने मला त्यांच्या एडिटिंग स्टुडिओमध्ये बोलावले होते. त्यांनी मला धोखा या चित्रपटाची ऑफर दिली. मला चित्रपटाची थीम आवडली नाही. अशा परिस्थितीत मी चित्रपट करण्यास नकार दिला. कंगनाच्या म्हणण्यानुसार नकार दिल्यानंतर महेश भट्ट त्यांच्यावर खूप रागावले.

कंगनाने सांगितले आहे की महेश भट्ट माझ्यावर ओरडू लागले. मला मा रण्यासाठी ते पुढे पण आले होते, मग त्यांची मुलगी पूजा भट्ट ने त्यांना थांबवले. त्या दिवशी महेश भट्ट यांनी मा रण्या पासून ती बचावली, असे कंगनाने म्हटले आहे. कंगना रनौत यांनी नाकारलेल्या चित्रपटाविषयी त्यांनी सांगितले की.

या चित्रपटाची कहाणी अशी आहे की पो लिसांच्या अ त्याचाराने कंटाळलेली मुलगी आत्मघाती बॉम्बर बनण्यासाठी पाऊल उचलते. कंगना राणौत म्हणाली की त्यावेळी मी केवळ 18 वर्षांची होते, तरी पण चांगल्या प्रकारे विचार करण्याची क्षमता माझ्या मध्ये होती.

मुलगी आत्मघाती बॉम्बर बनण्याऐवजी आपल्या मेहनतीने पोलिसात दाखल होऊ शकली असती आणि बदल घडवून आणू शकली असती. मला ही कथा आवडली नाही आणि मी चित्रपट करण्यास नकार दिला.

चप्पल

याशिवाय कंगना रनौतने महेश भट्टशी संबंधित आणखी एक घटना सांगितली आहे. ‘वे लम्हे’ चित्रपटाच्या चाचणी दरम्यान ही घटना असल्याचे त्याने म्हटले आहे. कंगना राणौत यांच्या म्हणण्यानुसार महेश भट्ट थिएटरच्या मेन गेटवर आले होते आणि त्यांनी मला बाहेर काढले होते. ते माझ्यावर ओरडतही होते. तरीही मी काही प्रकारे आत जाण्याचा प्रयत्न केला कारण मला माझा चित्रपट पहायचा होता. महेश भट्ट यांनी पुन्हा बघितले. त्यांची चप्पल माझ्यावर फेकली. त्यानंतर दोन जणांनी त्यांना पकडले व आत नेले.

आ त्मह त्या विचार

एकदा तिने आत्महत्येबद्दल विचार करण्यास सुरवात केली, असे कंगना रनौत यांनी सांगितले आहे. 2016 मध्ये जेव्हा तिने तनु वेड्स मनु रिटर्न्स सारखे हिट चित्रपट दिले, तेव्हा त्यांच्यासमोर ब्रँडची लाईन लागली होती. त्यावेळी त्यांनी 18 ब्रॅण्ड् सोबत करार केले होते. कंगना म्हणाली की यानंतर अचानक माझ्या आयुष्यात गोंधळ उडाला.

2013 मध्ये, ज्याच्यामुळे माझा प्रेमभंग झाला होता, तो अचानक समोर आला आणि त्याने माझ्यावर गुन्हा दाखल केला. कंगनाने तिच्या पुर्व प्रियकराचे नाव सांगितले नाही, परंतु सर्वांना ठाऊक आहे की तो हृतिक रोशन च होता. मला हे सर्व खूप विचित्र वाटले होते, परंतु प्रत्यक्षात हे सर्व नियोजन करून घडवून आणले होते असे कंगनाने सांगितले.

कंगना म्हणाली की तिच्यासाठी डायन सारखा शब्द वापरला गेला होता. कंगनाच्या म्हणण्यानुसार, तिने आपले आयुष्य संपविण्याचा विचार केला नाही, परंतु कुठेतरी अदृश्य होऊन जावे, असे तीला वाटले.

Leave a Comment