ऑपरेशन दरम्यान या महिलेच्या पोटात डॉक्टरांकडून चुकून राहून गेला टॉवेल, त्यांनतर 4 महिन्याने जे झाले ते पाहून तुमचेही होश उडतील…’

नुकतीच यूपीमधील सीतापूर येथील रुग्णालयाची लापरवाही उघड झाली आहे. यावेळी झाले असे की ऑपरेशन दरम्यान रुग्णालयाच्या एका डॉक्टरने एका महिलेच्या पोटातच टॉवेल ठेवल्याचा आरोप केला आहे. या महिलेने पोटदुखीची तक्रार केली पण त्या रुग्णालयातील लोकांनी तिचे म्हणणे ऐकले नाही.

पण त्यानंतर या महिलेला दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. हे संपूर्ण प्रकरण सीतापुरात असलेल्या जिल्हा महिला रुग्णालयात घडले आहे. पीडितेच्या नवऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या पत्नीला बाळ होणार होते.

आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले होते. जेथे सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांनी तिचे ऑपरेशन केले. त्याच शहरातील सीतापूर येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद फैजान अख्तर अन्सारी यांनी सांगितले की, त्याची पत्नी शागुफ्ता अंजुम हिला प्रसूती कळा येऊ लागल्याने 5 जून 2020 रोजी जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण जेव्हा तिची प्रकृती गंभीर बनली तेव्हा सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांनी तिचे ऑपरेशन केले आणि ऑपरेशननंतर त्याच्या पत्नीने एका बाळाला सुद्धा जन्म दिला. तथापि, ऑपरेशननंतर शागुफ्ता अंजुमला सतत पोटदुखी आणि उलट्या होत राहिल्या.

याबाबत शागुफ्ता अंजुम यांनी डॉक्टरांकडे तक्रार केली पण डॉक्टरांनी तिचे म्हणे ऐकून घेतले नाही आणि त्यावेळी डॉक्टरांनी वेदना आणि उलट्यासाठी औषध लिहून दिले आणि त्यानंतर तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. पण घरी आल्यानंतरही शागुफ्ता अंजुमची प्रकृती ठीक नव्हती आणि तिचे पोट खूपच कडक झाले होते.

आपल्या पत्नीची तब्येत पाहून मोहम्मदने आपल्या पत्निला लखनऊला एका रूग्णालयात आणेल तेव्हा त्याला कळाले की तिच्या पोटात टॉवेल आहे. मोहम्मद फैजान यांच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशननंतरच त्याच्या पत्नीचे पोट खूप कडक झाले होते आणि आपल्या पत्नीला त्या औषधाचा फायदा न झाल्यामुळेच लखनौला दाखल केले होते.

तेव्हा अल्ट्रासाऊंड, सिटी स्कॅन सुद्धा करण्यात आपले. पण त्यामधूनही काहीही स्पष्ट झाले नाही. त्यानंतर, डॉ. झेड खान यांनी त्यांना एमआरआय करण्यास सांगितले आणि एमआरआयने पोटात काही घन वस्तू असल्याचे दर्शविले.

त्यावेळी डॉक्टरांनी पुन्हा ऑपरेशन करण्यास सांगितले आणि या ऑपरेशननंतरच तिच्या पोटातून टॉवेल बाहेर काढण्यात आला. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्या टॉवेलमुळेच पोटामध्ये संक्रमण पसरले होते आणि त्यामुळेच त्या रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

त्या टॉवेलमुळे पोटातील एक आतडे सुद्धा सडले होते, ज्या आतड्याला डॉक्टरांना कापावे लागले. तथापि, शागुफ्ता अंजुमची प्रकृती आता योग्य आहे. हे प्रकरण सुमारे 4 महिन्यांपूर्वी नोंदवले गेले होते. या घटनेनंतर मात्र सीएमएस डॉ. सुषमा कर्णवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Comment