ऑनलाईन लुडो खेळता-खेळता झाले प्रेम, मुलाला भेटायला युपी वरून गुजरात ला पोहचली हि मुलगी, त्यांनतर जे झालं ते धक्कादायक होत..’

लॉकडाउन मध्ये कंटाळा येत असेल ना आणि कंटाळा आला तर मित्रांसोबत ऑनलाईन बरेच गेम आपण खेळले असतील आणि त्या गेम्स पैकी सर्वात जास्त खेळला जाणारा गेम तो म्हणजे लुडो किंग. आपण लॉक डाऊन मध्ये एकवेळ तरी लुडो किंग खेळून पाहिले असेलच.

टाइमपास म्हणून यापूर्वी युवकांकडून खेळत असलेला लुडो गेम यानिमित्ताने घराघरात पोहचला आहे. लहानांपासून ते अगदी मोठयापर्यंत असे अनेकजण हा गेम खेळतात. पण या गेमने आता कुटुंबाचाच गेम केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बहुतेक घरात भांडणे लावण्याचे कामही लुडो गेम करतो आहे.

ऑनलाईन लुडो गेम खेळणाऱ्या 17 वर्षीय एका मुलीची दुसऱ्या शहरात राहणाऱ्या एका मुलाबरोबर मैत्री झाली. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले की मुलगी आपल्या घरातील सदस्यांना न सांगता 12 ऑक्टोबरला पळून नोएडाहून गुजरात येथे गेली.

कौटुंबिक त क्रारीनंतर पो लिस का रवाई झाली आणि मुलीला तिच्या घरी परत आणता आले. ही घटना आहे नोएडा सेक्टर 58 या ठिकाणची. ही अल्पवयीन मुलगी अचानक गायब झाल्याचे घरातल्यांच्या लक्षात आले. पुढे हे कुटुंब खूप घाबरून गेले व मुलीच्या कुटूंबाने नोएडा पो लिसांशी संपर्क साधला.

पो लिसांनी प्रथम त्या मुलीचे कॉल डीटेल्स तपासले. एकाच नंबरवर खूप वेळा फोन केल्याचे त्यांना दिसून आले. हा नंबर एका मुलाचा होता. जेव्हा पो लिसांनी अधिक तपास केल्यावर तेव्हा उघडकीस आले की हाच मुलगा तिच्याबरोबर ऑनलाईन गेम खेळत असायचा.

तिकडे पो लिसांनी त्या मुलाशी संपर्क साधला आणि तो मदत करण्यासाठी सहमत झाला. त्याने पो लिसांना सांगितले की मुलगी कोणत्या ट्रेनने निघाली आहे आणि गुजरात मध्ये ती कधी पोहोचेल. ही सर्व माहिती गोळा केल्यानंतर पो लिसांनी विमानाने गुजरात मध्ये एक टीम पाठवली.

ती मुलगी तिथे पोहचण्यापूर्वीच नोएडा पोलिसांची टीम तेथे पोहोचली. त्या मुलाने तिला विश्वासात घेवून तिला पो लिसांकडे सोपवले. यानंतर पोलिसांनी या मुलीस तिच्या कुटुंबातील सदस्यांकडे सुखरूप पोहचवले .

असा खेळतात गेम:-

लुडो किंग हा गेम बहुतेक तरुण व गृहिणींच्या मोबाईलमध्ये असतो. दोन किंवा चार जणांना एकाच वेळी हा गेम खेळता येतो. जुन्या पद्धतीच्या चंफुलसारखा असलेला हा गेम खेळताना ज्याच्या सोंगट्या सर्वात आधी संपूर्ण राऊंड मारून मध्यभागी असलेल्या घरात पोहोचेल तो विजयी होतो.

हा गेम पैशावर खेळला जात असेल तर पहिल्या दोन व्यक्तींना त्याचे पैसे दिले जातात. त्यातही प्रथम विजयी होणाऱ्याला जास्त पैसे दिले जातात. घरात खेळताना मात्र पती-पत्नी कुटुंबातील इतर सदस्य खेळतात. एकमेकांची सोंगटी मा रल्यानंतर आवाज करून एकमेकांवर रागवण्याचे प्रकारही होतात.

अभासी दुनियेत घेवून जाणारा गेम:-

कोणतेही मोबाईलवरील गेम हे मानवी मेंदूला जखडून ठेवतात. त्यामुळे माणूस अभासी दुनियेत जातो. वास्तवातील गोष्टींशी त्याची नाळ तुटत जाते. मेंदूला ज्या गोष्टींची सवय लावतो, तसाच तो काम करतो. गेमची सवय लागलेली मुले पुढे त्रास देतात. पपजी प्रमाणेच लुडो किंग हा गेमही धोकादायक आहे. तो खेळताना आपली मुले स्वतःमध्ये हरवून जात आहेत.

Leave a Comment