एकेकाळी या पाकिस्तानी अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झाला होता सलमान खान, पण या कारणामुळे होऊ शकले नाही लग्न…

सोशल मीडियावर सलमान खानबद्दल विविध प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतात. त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील अनेक बातम्या व्हायरल होत असतात. सांगायचे झाले तर सलमान खान आणि सोमी अलीच्या नात्याबद्दल अशीच एक बातमी खुपच चर्चेत आहे. सोमी अली एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.

तिने एका मुलाखतीत सांगितले होते की सलमान तिचा पहिला प्रियकर आहे. 2011 मध्ये दिलेल्या मुलाखतीत तिने याचा उल्लेख केला होता. सोमी अली मूळची पाकिस्तान मधील कराचीची रहिवासी आहे, तिने 1992 मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता आणि तिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. सोमी अलीने सलमान खानबरोबरही काम केले आहे.

सोमी अलीला सलमान खानसोबत लग्न करायचं होतंः

एका मुलाखतीत सोमी अलीने सांगितले की, “मी किशोरवयात असताना सलमान माझा क्रश होता. मी अगदी लहान वयातच सलमान खानच्या प्रेमात पडले होते आणि मला सलमानसोबत लग्न करायच होत. सलमानसोबत लग्न व्हावे म्हणून मी चित्रपटांमध्ये आली.” ती सलमानला भेटली तेव्हा ती अवघ्या 15 वर्षाची होती.

सलमान खानही माझ्यावर प्रेम करू लागला होता, असा तिचा दावा आहे. सोमीने संगितले की ती सलमानवर डोळे मिटून विश्वास ठेवत होती. तिने सलमानला आठ वर्षे डेट केले आहे. सोमी अलीने सलमानचा 1989 मधील ‘मैंने प्यार किया’ हा चित्रपट पहिला तेव्हा तिला त्याचे वेड लागले आणि ती सलमानसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागली .

सलमान आणि सोमी अलीच्या नात्यात ऐश्वर्या मधी आलीः

सलमान आणि सोमी अलीची जोडी जास्त काळ टिकू शकली नाही आणि 2000 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर सोमी लवकरच भारत सोडून फ्लोरिडामध्ये स्थायिक झाली. त्यांचे विभक्त होण्याचे एक कारण ऐश्वर्या राय होती. वास्तविक ऐश्वर्या राय त्यावेळी सलमान आणि सोमी अली यांच्यात आली होती.

पण ब्रेकअपसाठी सोमी कोणालाही दोष देत नाही. सोमीने एका मुलाखतीत सांगितले की, सलमान खानसोबत ब्रेकअप झाले याचा तिला काहीच खेद नाही, आणि सलमान खान एक चांगला माणूस आहे आणि तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे, मला त्याच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले आहे.

सोमी अलीने 10 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सोमी अलीने ‘अंत’, ‘किशन अवतार’, ‘तिसरा कौन’, ‘आंदोलन’ आणि ‘अग्नि चक्र’ यांसारख्या 10 चित्रपटांत काम केले आहे. सोमी अलीने सलमान खानबरोबर ‘बुलंद’ नावाच्या चित्रपटात काम केले आहे पण हा चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाला नाही. चित्रपटाची शूटिंग 80 टक्के झाली होती पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित केला नाही.

हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नसला तरी या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि सोमी अली एकमेकांच्या खुप जवळ आले होते आणि त्याचवेळी त्यांचे प्रेम वाढले. जरी त्यांची प्रेमकथा पुढे गेली नाही तरीदेखील सोमी अली स्वत: ला खूप भाग्यवान मानते की सलमान खान तिच्या आयुष्यात आला.

Leave a Comment