एकेकाळी एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते बॉलीवूड चे हे 7 कपल, पण आज एकमेकांचा चेहरा बघणे सुद्धा त्यांना पसंत नाही…

बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपे आहेत जे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर त्यांनी लग्न केले. पण प्रत्येकासोबत असे होईलच असे नाही. असे काही सेलिब्रिटी आहेत ज्यांनी एकेकाळी एकमेकांवर खूप प्रेम केले होते पण आज त्यांना एकमेकांशी बोलणे देखील पसंत नाही. आज आम्ही अशाच काही बॉलिवूड कपल्स बद्दल सांगणार आहोत ज्यांनी एकेकाळी सोबत राहण्याची शपथ घेतली होती आणि मग अचानक ते वेगळे झाले.

१. सलमान खान आणि ऐश्वर्या:

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतीलच. 1999 मध्ये आलेल्या “हम दिल दे चुके सनम” या चित्रपटातील ऐश्वर्या आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती, त्यादरम्यान सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांवर खुप प्रेम करत होते. पण सलमानच्या वाईट सवयी आणि वाईट वागण्यामुळे ऐश्वर्या त्याच्यापासून विभक्त झाली.

पण विभक्त झाल्यानंतरही सलमानने ऐश्वर्याचा पाठपुरावा सोडला नाही, जेव्हा जेव्हा ऐश्वर्या तिचा चित्रपटाचे शूट करायची तेव्हा सलमान तिथे पोहोचायचा आणि गोंधळ करायचा. एकदा ऐश्वर्या विवेकला डेट करत होती तेव्हा सलमानने विवेकला फोन करुन खूप शिवीगाळ केली आणि त्याला धमकी दिली. नंतर ऐश्वर्या विवेकपासून विभक्त झाली परंतु सलमानबरोबर तिचे संबंध कधीच सुधारले नाहीत आणि आजही त्या दोघांचा छत्तीसचा आकडा आहे.

२. अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी:

अक्षयचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले असले तरी 90 च्या दशकात शिल्पा शेट्टीसोबत त्याचे अफेअर सर्वाधिक चर्चेत होते. ही त्या वेळची गोष्ट आहे जेव्हा अक्षय आणि रवीना टंडन एकमेकांच्या अगदी जवळ होते, पण रवीना आणि अक्षयचा ब्रेकअप होताच शिल्पा शेट्टी अक्षयच्या आयुष्यात आली. दोघांनी लग्नाचे नियोजन सुरू केले होते.

पण हे नातेही फार काळ टिकू शकले नाही. जेव्हा ट्विंकल खन्नाने अक्षयच्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा शिल्पाबरोबरचा त्याचा जुना संबंध तुटला. शिल्पाने देखील एका मुलाखतीत अक्षयवर आरोप केला होता की अक्षयने तिचा वापर केला आणि नंतर सोडून दिले. आजही शिल्पा आणि अक्षय एकमेकांसोबत बोलत नाहीत.

3. सुष्मिता सेन आणि रणदीप हुड्डा :

सुष्मिता सेन आणि रणदीप हुड्डा हे 2008 -2010 या काळात एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. ‘कर्मा’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते एकमेकांना भेटले. सुष्मिता त्यावेळी बॉलीवूड अभिनेत्री होती, तर रणदीप नविनच बॉलीवूड इंडस्ट्रीत आला होता. काही काळ एकमेकांसोबत राहिल्यानंतर दोघांनी अचानक ब्रेकअपची घोषणा केली. आज रणदीप हुड्डा या ब्रेकअपला त्याच्या आयुष्यातील सर्वात चांगला निर्णय मानत आहे.

4. अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर:

बर्याच लोकांना हे माहीत नसेल की ऐश्वर्याच्या अगोदर अभिषेकचे करिश्मासोबत लग्न ठरले होते, या निर्णयाने ते दोघेही खुप खूष होते. पण माहित नाही अचानक कपूर परिवाराने हे नातं का मोडलं. त्यानंतर कपूर कुटुंबीयांनी करिश्माचे लग्न एका मोठ्या उद्योगपतीशी म्हणजेच संजय कपूर सोबत लावून दिले. मात्र, संजय कपूरबरोबर काही वादांमुळे करिश्माचा घटस्फोट झाला आणि आज करिश्मा तिच्या कुटुंबासमवेत एकटीच राहते आणि अभिषेकसोबत तिचा संवाद संपलेला आहे.

5. शाहिद कपूर आणि करीना कपूर:

करिना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न करुन आज बरीच वर्षे झाली आहेत, तर शाहिद कपूरही मीरा राजपूतसोबत लग्न करून स्थायिक झाला आहे. पण एक काळ असा होता की शाहिद कपूर आणि करीना कपूरचे अफेअर संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चेत होते. जस जसे या दोघे त्यांच्या करिअर मध्ये पुढे गेले तसतसे या दोघांमधील अंतरही वाढत गेले.

करीनाने जेव्हा सैफ अली खानशी लग्न केले तेव्हा शाहिद एकटा पडला आणि ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी त्याला बराच वेळ लागला. 2016 मध्ये आलेल्या “उडता पंजाब” या चित्रपटात हे दोघे पुन्हा एकदा एकत्र दिसले होते , पण दोघांमध्ये विशेष संभाषण झाले नाही. उडता पंजाबच्या प्रमोशन दरम्यान करीना शाहिदकडे दुर्लक्ष करताना दिसली.

6. हृतिक रोशन आणि कंगना रनौत:

कंगना रनौत आणि हृतिक रोशन यांच्यातील प्रेमाबद्दल कोणालाही काही माहिती नाही, परंतु या दोघांची शत्रुता सर्वांसमोर समोर आली आहे आणि आज या दोघांना एकमेकांचा चेहरा देखील बघायचा नाही. कंगना राणौतने मागील वर्षी ‘आप की अदालत’ या टिव्ही शोमध्ये हृतिकवर गंभीर आरोप केले होते आणि हृतिकसोबत तिचे अफ़ेअर होते असा दावा केला होता परंतु हृतिकने हे सर्व आरोप स्वीकारण्यास नकार दिला.

7. जॉन अब्राहम आणि बिपाशा बासु:

जवळपास 10 वर्षे रिलेशनमध्ये राहिल्यानंतर जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू एकमेकांपासून विभक्त झाले. हे दोघे लग्नापर्यंत पोहोचले होते पण बिपाशापासून लपून जॉनने अचानक प्रिया रुंचलसोबत लग्न केले. जेव्हा बिपाशाला जॉनच्या लग्नाविषयी माहिती मिळाली तेव्हा तिचे हृदय तुटले आणि तिला खुप धक्का बसला नंतर ती जॉन पासुन दुर गेली. आज करण ग्रोवरसोबत लग्न करून बिपाशा खूप आनंदी आहे पण ती जॉनच्या फसवणूकीला आयुष्यभर विसरू शकत नाही.

Leave a Comment