प्रत्येकाला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावण्याची इच्छा आहे पण प्रत्येकासाठी या इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होणे जवळजवळ अशक्य आहे कारण या इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा जास्त ज्येष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री उपस्थित आहेत ज्या आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर लोकांच्या मनावर राज्य करत आहे.
या इंडस्ट्रीत असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपले नशीब आजमावले पण ते फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत, यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये त्यांचा प्रवास खुप कमी काळ राहिला. तुम्ही सर्वजण चित्रपटसृष्टीची ड्रीमगर्ल आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची सुंदर मुलगी ईशा देओलला ओळखतच असाल.तिने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नशीब आजमावले होते पण तिला तिच्या आई-वडिल आणि भावांप्रमाने यश मिळवता आले नाही.
अगदी थोड्याच वेळात अभिनेत्री ईशा देओलची चित्रपट कारकिर्द संपली आणि तिने लग्न केले. फक्त ईशा देओलच नव्हे तर बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची चित्रपट कारकीर्द लवकरच संपली. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे अशा अभिनेत्रींविषयी माहिती देणार आहोत ज्यांची बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कारकीर्द खूपच लहान होती आणि त्यांचा प्रवास खूप लवकर संपला.
ईशा देओल
बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओलने 2002 मध्ये “कोई मेरे दिल से पुछे” या चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती, त्यानंतर तिने धूम या ब्लॉकबस्टर चित्रपटातही काम केले होते, 2015 मधील “किल देम यंग” हा तिचा शेवटचा चित्रपट होता. 2012 मध्ये तिने भरत तख्तानीशी लग्न केले होते, पण आता ती 2018 मध्ये आर 16 केकवॉक या चित्रपटात दिसणार आहे.
शमिता शेट्टी
बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टीने आपल्या करिअरची सुरुवात सन 2000 मध्ये मोहब्बते या ब्लॉकबस्टर चित्रपटाद्वारे केली होती. शमिता शेट्टीची चित्रपट कारकीर्द काही खास नव्हती बहुतेक चित्रपटांमध्ये तिला साइड रोल मिळाला होता. 2007 मध्ये ती हरी पुत्तर या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसू लागली आणि सध्या ती मोठ्या पडद्यापासून खुप दूर गेली आहे.
ट्विंकल खन्ना
बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1995 च्या ‘बरसात’ या चित्रपटातून केली होती, हा चित्रपट बॉलीवूडच्या मेगाब्लॉक बस्टर चित्रपटांपैकी एक होता. पण 6 वर्षांच्या आतच तिची कारकिर्द संपली. 2001 मध्ये ती अखेर “लव्ह के लिये कुछ करेगा” या चित्रपटात दिसली होती. तिने 2001 मध्ये बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारशी लग्न केले आणि बॉलिवूड चित्रपटांपासून खुप दूर गेली.
आयशा टाकिया
बॉलिवूड अभिनेत्री आयशा टाकियाने 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय आयशा टाकिया अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली होती. ती ‘वांटेड’ या चित्रपटात सलमान खानसोबत दिसली होती. 2011 मधिल ‘मोड’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता. 2009 मध्ये तिने फरहान आजमीशी लग्न केले आणि आता त्यांना एक मुलगा झाला आहे.