इतक्या सुंदर आणि हॉट असूनही बॉलिवूड मध्ये आपली जादू करू शकल्या नाहीत या 5 अभिनेत्र्या, करायला लागले होते आईचे रोल..’

बॉलिवूडमध्ये अनेकदा नवीन चेहरे पाहायला मिळतात. बर्याचदा मुली नायिका होण्याच्या स्वप्नासह चित्रपटसृष्टीत प्रवेश करतात, परंतु एक दोन चित्रपट केल्यानंतर यश न मिळाल्यामुळे त्या परत जातात किंवा लग्न करुन स्थायिक होतात.

तसेही चित्रपट जगात अभिनेत्रींचे करिअर खूप छोटे मानले जाते. अशा खुपच कमी अभिनेत्री आहेत ज्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बर्‍याच काळ काम करण्यास सक्षम असतात. काही अभिनेत्री अशा देखील आहेत ज्यांनी एक-दोन चित्रपटांत काम केल्यानंतर यशस्वी न झाल्यामुळे बॉलिवूडमधून निवृत्ती घेतली.

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा पाच अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या सुंदर असूनही त्यांना चित्रपटसृष्टीत यश मिळू शकले नाही. बॉलिवूड अभिनेत्री टिस्का चोप्राचा वाढदिवस १ नोव्हेंबरला असतो. सौंदर्याच्या बाबतीत सांगायचे तर टिस्का मोठ-मोठ्या नायिकांना मागे टाकते.

तिची चित्रपट कारकीर्द सामान्य होती. टिस्का बॉलिवूडमध्ये बर्‍याच दिवसांपासून काम करत आहे, पण आमीर खानचा सुपरहिट चित्रपट ‘तारे जमीन पर’ केल्या नंतर तिला एक नवीन ओळख मिळाली. टिस्काने ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात बाल कलाकार ईशान अवस्थीच्या आईची भूमिका केली होती.

टिस्काने ‘प्लॅटफॉर्म’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या यादीतील दुसरे नाव आहे अभिनेत्री हुमा कुरेशी…. हुमा इतकी सुंदर आहे की सर्वांना तिचे सौंदर्य आवडते. हुमा कुरेशीला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या सुपरहीट चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली होती.

यानंतर हुमाने बर्‍याच चित्रपटांमध्ये आणि खासगी अल्बममध्ये काम केले, पण हुमा कुरेशीला आजपर्यंत स्टारडम मिळू शकले नाही. आजही हुमा कुरेशी यशस्वी होण्यासाठी धडपडत आहेत. निम्रत कौरचे सौंदर्य आजही शाबूत आहे. बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणार्या अक्षय कुमारच्या ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात निम्रतने मुख्य भूमिका साकारली होती.

निम्रतने फारच कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामुळे फ्लॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये निम्रतचादेखील समावेश आहे. बॉलिवूडची निरागस पंजाबी ऋचा चित्रपटसृष्टीत नायिका बनण्यासाठी आली होती, पण तिच्या अभिनयामुळे तिला नेहमीच चित्रपटांमध्ये बाजूच्या भूमिका मिळाल्या.

तसे, ‘फुकरे’ चित्रपट हिट झाल्यानंतर ऋचा काही दिवस चर्चेत होती. पण अभिनेत्री म्हणून तिची कारकिर्द काही खास नव्हती. शेवटी आम्ही तुम्हाला अभिनेत्री माही गिल बद्दल सांगत आहोत…. माही गिल बॉलिवूडच्या मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली आहे.

देव डी या चित्रपटा नंतर माही गिलला ओळख मिळाली होती. माही गिल खूप सुंदर आहे पण इतकी सुंदर असूनही माहीची चित्रपट कारकीर्द काही खास नाही. चित्रपटांमध्ये यश न मिळाल्यामुळे माही लवकरच बॉलिवूडमधून निवृत्त झाली आणि चित्रपटांपासून दुर गेली.

Leave a Comment