आपल्याला माहित असेल की देवउठनी एकादशीच्या निमित्ताने पुन्हा एकदा देशभरात लग्नाचा मौसम सुरू झाला आहे. या दरम्यान अनेक नामांकित सेलिब्रिटीसुद्धा सात फेरे घेणार आहेत. तर सामान्य लोकही त्यांच्या लग्नाबाबत खूप उत्सुकता बाळगत आहेत.
तथापि, यादरम्यान अनेक विवाहसोहळ्यामधून बर्याच विचित्र आणि दुखःद घटना देखील आपणास ऐकण्यास येत आहेत. आता अशीच एक दुःखद घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर भागातील एक मुलगा आणि नेबुआ या गावातील एक मुलगी येत्या रविवारी सात फेऱ्या घेणार होत्या .
पण ज्या दिवशी वराच्या लग्नाची मिरवणूक निघणार होती त्याच दिवशी वधूने या जगाचा अखेरचा निरोप घेतला. वास्तविक उत्तर प्रदेशच्या कुशीनगर परिसरातील आबडकरी गावचा असणारा हा मुलगा म्हणजेच ओमप्रकाश कुशवाह याचा विवाह २ नोव्हेंबर रोजी नेबुआ नरंगिया पोलिस स्टेशन परिसरातील खुचा टोला .
येथे राहणाऱ्या श्रीनारायण याच्या मुलींशी म्हणजेच मायाशी होणार होता. या ठरलेल्या लग्नामुळे वधू-वर दोघांचीही कुटुंबे खूप आनंदी होती आणि दोन्ही कुटुंबे लग्नाच्या अंतिम तयारीत व्यस्त होती. पण एका या दुःखद बातमीने दोन्ही कुटुंबातील आनंद शोकात बदलला.
26 नोव्हेंबर रोजी वधू मायाच्या कुटुंबीयांनी वर ओमप्रकाश याचा टिळक समारंभ देखील केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच दिवशी वधू माया आपल्या भावासोबत लग्नाच्या काही वस्तू घेण्यासाठी गेली होती. यादरम्यान दुचाकीचा तोल गेला आणि माया जखमी झाली.
त्यावेळी मायावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिला तिच्या घरी आणण्यात आले. पण रविवारी अचानक पहाटे मायाची तब्येत ढासळली आणि तिने आपले प्राण सोडले.
आपल्या भावी वधूच्या मृत्यूची बातमी जेव्हा वराला मिळाली तेव्हा तो
अक्षरश चक्कर येऊन पडला. वधूच्या कुटूंबाबरोबरच वराच्या कुटूंबावर ही शोककळा पसरली. वधूच्या लग्नाच्या मिरवणुकीला निरोप देणारे नातेवाईक आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांनी आता त्या वधूच्या अंतिम संस्काराला हजेरी लावली होती.