नेहमी प्रमाणे आजही आम्ही आपल्यासाठी एक खास व्यक्ती बद्दल माहिती घेऊन आलो आहे, वाचा पुढे.. लगान चित्रपट म्हंटला कि सर्वप्रथम समोर दिसते ती लगानची क्रिकेट टीम आणि त्या टीम चा कर्णधार भुवन म्हणजेच अमीर खान.
अनेक दिग्गज कलाकर या चित्रपटामध्ये पाहायला मिळाले होते. परंतु जस जसे वेळ निघून जातो तस तसे एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये खूप बदल होत जातात. काही लोक चेहऱ्याने बदलतात तर काही लोक मनाने देखील बदलतात. तसेच काही या चित्रपटाच्या बाबतीतही झाले आहे. १५-२० वर्षापूर्वी जे चित्रपट मोठ्या पडद्यावर आले होते.
त्यातील कलाकार इतके बदलले आहेत कि त्यांना ओळखणे देखील मुश्कील झाले आहे. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे लगान चित्रपटातील ग्रेसी सिंग. ज्यांनी बऱ्याच यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आज ती बॉलीवूडपासून खूप दूर आहे. १९ वर्षामध्ये खूप बदल झाला आहे लगानच्या या अभिनेत्रीमध्ये, काय तुम्हीसुद्धा तिचे चाहते आहात?
१९ वर्षामध्ये खूप बदल झाला आहे लगानमधील या अभिनेत्रीमध्ये
२० जुलै १९८० ला दिल्लीमध्ये अभिनेत्री ग्रेसी सिंहचा जन्म झाला होता. सुरवातीचे तिचे शिक्षण दिल्लीमध्येच झाले. अभिनयाची आवड असल्यामुळे ती मुंबईला आली. ग्रेसीला सर्वप्रथम एका सिरीयलमध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली. ज्यात ५ मुख्य अभिनेत्री होत्या आणि त्यापैकी ती एक होती.
मग हळू हळू काळ बदलत गेला आणि तिला अमीर खानसोबत लगान चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली. भले हि आज ग्रेसी बॉलीवूडपासून दूर आहे परंतु छोट्या पडद्यावर पुनरागमन केल्यानंतर ती खूप आनंदी आहे. 15 जून २००१ ला लगान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला होता.
आणि निरागस गौरीच्या भूमिकेमध्ये असलेल्या ग्रेसी सिंगनेहि करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट ऑस्करसाठीसुद्धा नोमिनेट झाला होता. आणि ही ग्रेसीसाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. परंतु बऱ्याच वर्षानंतर ग्रेसीमध्ये पूर्णपणे बदल झाला आहे.
आज ती आपल्या आयुष्यामध्ये खूप खुश आहे आणि तिच्यात खूप बदल देखील झाला आहे. तुम्हाला माहिती नसेल पण, ग्रेसीने मुन्नाभाई एमबीबीएस, गंगाजल सारख्या सुपर हिट चित्रपटामध्येदेखील काम केले आहे. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात १९९७ मध्ये अमानत या सिरीयलमधून सुरु केली होती.
परंतु ३८ वर्षाच्या अभिनेत्रीचे करियर आज पूर्णपणे संपुष्टात आले आहे. पण टीव्ही जगतातील लोकप्रिय चेहर्यांपैकी ती एक आहे. काही सफल चित्रपटात काम केल्यानंतर त्यांनी आणखी काही चित्रपटांमध्ये काम केले परंतु ते फ्लॉप झाले त्यानंतर त्यांना वाटले कि त्यांचा बॉलीवूडमध्ये काही निभाव लागू शकणार नाही त्यामुळे त्यांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करणेच पसंत केले.
बॉलीवूडमध्ये असफल झाल्यानंतर ग्रेसीने तेलुगु, पंजाबी, गुजराती, मलयालम, कन्नड़, मराठीसारख्या विविध भाषांच्या चित्रपटामध्ये आपले नशीब नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. पण तिथेही तिला निराशाच हाती लागली. ग्रेसीने टीव्हीवरील खूप सारे पुरस्कार जिंकले आहेत.
आणि लगानसाठी तिला IIFA अवॉर्डसुद्धा मिळाला आहे. तिला लगानसाठी ‘झी सीने अवॉर्ड’ आणि ‘स्क्रीन अवॉर्ड’ ने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. फिल्मी जगतापासून दूर झाल्यानंतर ग्रेसीने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आणि २०१८ ला छोट्या पडद्यावर संतोषी माता बनून चाहत्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले.