आपल्याला माहित आहे की लग्नात वधू-वर अगदी आनंदाने सात फेऱ्या घेतात. पण आपल्या देशात अशी काही गावे आहेत जिथे वर म्हणजेच मुलगा त्याच्या लग्नात येत नाही तर त्याच्या जागी त्याची बहीण लग्नात वधू बरोबर सात फेरे घेती.
होय,आपल्या भारतातील गुजरात राज्यात अशी तीन गावे आहेत जिथे वरांची बहिण वधूबरोबर लग्नाला उभी असते. हा अनोखा विवाह अनेक वर्षांपासून गुजरातच्या तीन खेड्यांमध्ये होत आहे.
आदिवासींची ही परंपरा:-
या तीन खेड्यांमध्ये आदिवासी लोक राहतात आणि त्याच्या येथे अशा प्रकारे लग्न केले जाते. प्रथेनुसार लग्नाच्या दिवशी वराची बहीण वऱ्हाड घेऊन येते आणि वराची बहिणीच मंडपात सर्व विधी पार पाडते आणि वधू सोबत सात फेऱ्या घेतल्या जातात आणि मग बाकीच्या विधी आटोपल्या जातात. त्याचबरोबर लग्न संपन्न झाल्यानंतर वधूचे कुटुंबीय त्या वराच्या बहिणी सोबत वाद घालतात.
वराला ठेवले जाते घरीच:-
प्रथेनुसार या लग्नावेळी वर आपल्या घरातच राहतो तसेच त्याची आई सुद्धा त्याच्या सोबत घरातच राहते. फक्त त्या वराचे वडील व इतर नातेवाईक त्या लग्नाला आपली हजेरी लावतात आणि वराच्या अविवाहित बहिणीला अगदी आनंदाने त्या लग्नासाठी घेऊन येतात.
त्याचवेळी एखाद्या वराला बहीण नसल्यास किंवा त्याच्या बहिणीचे लग्न झाले असल्यास वराच्या कुटूंबातील इतर कोणत्याही अविवाहित स्त्रीला लग्नासाठी आणले जाते.
यामुळे हे लग्न केले जाते:-
हा अनोखा विवाह सुरखेडा गावात केला जातो आणि या गावा व्यतिरिक्त सनदा आणि अंबळ या दोन गावातही याप्रकारे विवाह केला जातो. वास्तविक सुरखेडा गावातील लोक असे मानतात की वराला लग्नात आणल्यास वर आणि वधूच्या घरात कोणतीही वाईट दुर्घटना घडू शकते.
आणि याचा भीतीमुळे ही प्रथा तिथे अविरत चालू आहे. सुरखेडा गावातील कानजीभाई राठवा यांच्या म्हणण्यानुसार, ‘सर्व विधी वराची बहिण करते आणि सात फेरे सुद्धा वराची बहीणच घेते आणि या तीन गावात हजारो वर्षांपासून ही प्रथा सुरू आहे.
ही प्रथा मोडण्याचा प्रयत्न झाला पण:-
ग्रामप्रमुख रामसिंहभाई राठवा यांच्या म्हणण्यानुसार, अशी ही लग्नाची प्रथा अनेकांनी मोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यांच्याबरोबर वाईट गोष्टी घडल्या आहेत. रामसिंगभाई म्हणतात की ज्यांनी या प्रथेनुसार लग्न केलेले नाही त्याचे एकतर त्यांचे लग्न मोडले आहे किंवा त्यांच्या घरात एखादी मोठी समस्या निर्माण झाली आहे.