अक्षय कुमारचा राग-राग करायची बॉलिवूड ची हि सुप्रसिद्ध अभिनेत्री, बोलली अक्षय कुमार चमचा आहे, त्याने माझ्या सोबत..’

भारतातील कोरोना या साथीच्या आजाराचा परिणाम कमी झालेला नाही. लोकांच्या सोयी आणि गरजा लक्षात घेऊन सरकारने लॉकडाऊननंतर अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड आणि टीव्ही सेलेब्सही त्यांच्या गरजेनुसार घराबाहेर पडत आहेत.

अशा परिस्थितीत सेलेब्सच्या संबंधित अनेक कथा,फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दरम्यान, अक्षय कुमार आणि करिश्मा कपूर बद्दल एक किस्सा व्हायरल होत आहे. या दोघांनीही काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

पण एक काळ असा आला की करिश्मा अक्षयचा द्वेष करू लागली. आता करिष्मा चित्रपटांमध्ये क्वचीतच दिसते आणि अक्षयचे येत्या काळात बरेच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तो लवकरच लंडनमध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करनार आहे.

अक्षय आणि करिश्माने जानवर, मेरे जीवन साथी, हा मैने भी प्यार किया है यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. मुख्य अभिनेता म्हणुन करिश्मासोबत अक्षयचा दीदार हा पहिला चित्रपट होता. करिश्मा मोठ्या कुटुंबातली म्हणजेच कपूर खानदानातली आहे.

आणि अक्षयचा इंडस्ट्रीमध्ये कोणताही गॉडफादर नव्हता. दोघांच्या पार्श्वभूमीमध्ये मोठा फरक होता. दीदार चित्रपटाच्या सेटवर अक्षय खुप विनम्र स्वभावाचा होता.सेटवर करिश्माकडे कमी लक्ष दिले जात होते. त्याचवेळी दिग्दर्शक प्रमोद चक्रवर्ती अक्षयचा चांगला मित्र झाला.

अशा परिस्थितीत करिश्मा अक्षयवर एक दिवस रागावली होती की तो दिग्दर्शकाचा चमचा आहे. आणि तिने अक्षयचा खूप द्वेष करायला लागली. इतकेच नाही तर अक्षयला पाहिल्यावर करिश्माला त्रास होत असे. या उलट अक्षयच्या हृदयात करिश्माबद्दल कटुता नव्हती.

जोपर्यंत करिश्माच्या हातात मोठा चित्रपट नव्हता तोपर्यंत तिने इच्छा नसतानाही अक्षयबरोबर अनेक चित्रपट साइन केले. त्यानंतर करिश्माने निर्णय घेतला की ती आता अक्षयसोबत आणखी काम करणार नाही. तेव्हा तिने यश राजचा दिल तो पागल है हा चित्रपट साइन केला.

चित्रपटात अक्षयचीही एक छोटी भूमिका होती. चित्रपटात तिला अक्षय सोबत काम करायचे नव्हते. म्हणून तिने हा चित्रपट सोडला नाही आणि हा चित्रपट हिट झाला. करिश्माला संघर्ष हा चित्रपट ऑफर केला होता. तिला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती पण जेव्हा तिला समजले की अक्षय या चित्रपटात आहे तेव्हा तिने नकार दिला.

त्याच वेळी हेरा फेरी या चित्रपटाबाबतीतही असेच काही घडले. काही काळानंतर अक्षय-करिश्माचा बर्याच वर्षांपूर्वी शूट केलेला एक चित्रपट रिलीज झाला. जो हिट सिद्ध झाला. त्याचवेळी अक्षयचा हेरा फेरी हा चित्रपटही ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

तो सुपरस्टार बनला पण करिश्माची कारकीर्द घसरली होती. त्यानंतर अशी वेळ आली की करिष्माला चांगल्या हिरो विरुद्ध तसेच चांगल्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. त्यानंतर तिला एक रिश्ता या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

अक्षय या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. हे माहीत असुनही तिने या चित्रपटाला होकार दिला. जेव्हा अक्षयला विचारले गेले की करिश्माबरोबर काम करण्यात काही अडचण आहे का, तेव्हा तो म्हणाला होता- इंडस्ट्रीतील बर्‍याच लोक सुरुवातीला माझ्यासोबत चांगले वागले नव्हते, परंतु मी तसे करनार नाही .

Leave a Comment